अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची निवडणुकीतून माघार, कमला हॅरिस यांना पाठिंबा


वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपली माघार जाहीर करत उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना उमेदवार म्हणून पाठिंबा दिला.

 डेमोक्रॅटिक पक्षातील जवळच्या सहकाऱ्यांकडून पायउतार होण्यासाठी आलेल्या तीव्र दबावानंतर बायडन यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या निवडणुकील त्यांच्या भवितव्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

त्यांनी आपल्या एक्स हँडलवर अमेरिकेतील नागरिकांना उद्देशून पोस्ट करत आपला निर्णय कळविला. अध्यक्ष म्हणून उर्वरित कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ते या आठवड्याच्या अखेरीस राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

 बायडन यांनी म्हटले आहे की,माझा निर्णय पक्षाच्या आणि देशाच्या हिताचा आहे. मी माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझी कर्तव्ये पूर्ण करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे.तुमचा अध्यक्ष म्हणून काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.बायडन यांनी हॅरिस यांना अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार होण्यासाठी पाठिंबा दिला असून त्याअनुषंगाने त्यांनी म्हटले आहे की, २०२० मध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड करण्याचा होता. आणि मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय होता. आज मी कमला यांना आमची उमेदवारी देण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा देऊ इच्छितो. आता डेमोक्रॅट्सनी एकत्र येऊन ट्रंप यांना पराभूत करण्याची वेळ आली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची निवडणुकीतून माघार, कमला हॅरिस यांना पाठिंबा  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची निवडणुकीतून माघार, कमला हॅरिस यांना पाठिंबा Reviewed by ANN news network on ७/२२/२०२४ १२:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".