अमेरिकेत हुकूमशाही येणार?

 


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा निवडून आले तर देशात हुकूमशाही येईल असा प्रचार केला गेला होता. त्यामुळे मतदारात भीतीचे वातावरण होते.तसेच आता अमेरिकेतही तयार केले जात आहे. 

अमेरिकेत सध्या 'प्रोजेक्ट २०२५'ची   प्रचंड चर्चा आहे, निवडणुकीनंतर  डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले तर ते प्रोजेक्ट २०२५ अमलात आणतील आणि त्याच्यानंतर अमेरिकेत हुकूमशाही येईल असा प्रचार ट्रम्पविरोधकांनी सुरू केला आहे.

अमेरिकेची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक, नोव्हेंबर २०२४ मध्ये होणार आहे, ज्यामुळे जानेवारी २०२५ मध्ये ट्रम्प अथवा बायडन यापैकी एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनेल. अमेरिका ही जगातील सुपर पॉवर आहे, आणि तिचा राष्ट्राध्यक्ष कोण बनेल, यावर सध्या चर्चा होत आहे. अलीकडेच ट्रम्पवर झालेला हल्ला मोठ्या बातमीचा विषय बनला. या हल्ल्यातून बचावलेल्या ट्रम्प यांना नशिबवान मानले जात आहे. कारण त्यांच्यावर गोळी चालली आणि त्यांनी फक्त आपली मान वळवली म्हणून ते वाचले. अन्यथा ते आज जिवंत राहिले नसते. त्यांनी क्षणभरात आपली मान वळवली आणि त्यांच्या कानाला चाटून गोळी गेली आणि ते थोडक्यात वाचले. यामुळे त्यांना अमेरिकन नागरिकांची सहानुभूती मिळत आहे.त्यामुळे, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.

ट्रम्प यांच्या विरोधात आता बायडन यांच्या समर्थकांनी प्रचार सुरू केला की ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर हुकूमशाही येईल. याला 'प्रोजेक्ट २०२५' असे नाव दिले गेले आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी ट्रम्प निवडून आल्यास हुकूमशाही आणू शकतात असे म्हटले आहे.

काय आहे प्रोजेक्ट २०२५?

प्रोजेक्ट २०२५ हा एक मास्टर प्लान आहे हेरिटेज फाउंडेशन नावाच्या एका थिंक टँकने तयार केला आहे. हा थिंक टँक अमेरिकेसाठी धोरण तयार करतो. ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनी हा तयार केला आहे. ३८  लोकांनी हा प्रोजेक्ट लिहिला आहे, त्यातील ३१ लोक ट्रम्प यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ट्रम्प हुकूमशाही लागू करतील असे मानले जात आहे.

या प्रोजेक्टमध्ये काय आहे? 

असे म्हटले जात आहे की हे धोरण लागू केल्यानंतर शरणार्थींना अमेरिका प्रवेश बंद केला जाईल, पॉर्नोग्राफीवर बंदी घातली जाईल, चीनशी व्यापार बंद केला जाईल, एलजीबीटीक्यू कम्युनिटीवर मर्यादा आणली जाईल, राष्ट्राध्यक्षांच्या शक्ती वाढवल्या जातील, शिक्षण विभाग बंद केला जाईल आणि गर्भपातावरील गोळ्यांवर बंदी घालून महिलांचा राइट टू प्रेग्नन्सी काढून घेतला जाईल. नवीन अण्वस्त्रांची निर्मिती केली जाईल, कॉर्पोरेट आणि इनकम टॅक्समध्ये कपात केली जाईल, डाव्या विचारसरणीच्या सरकारी अधिकाऱ्यांना काढून टाकले जाईल, आणि संरक्षण आणि परराष्ट्र धोरण आक्रमक केले जाईल.

जर ट्रम्प हे लागू करत असतील तर अमेरिका नवीन रूपात दिसेल. ट्रम्प यांचा आधीचा कार्यकाल फॉरेन पॉलिसीबाबत आक्रमक होता आणि त्यांनी अनेक अनपेक्षित कामे केली होती. ट्रम्प नेहमीच शरणार्थींच्या विरोधात राहिले आहेत. त्यांनी अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमारेषेवर भिंत उभी केली.

तुम्हाला आठवत असेल तर ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे धोरण  आक्रमक होते. ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिका मवाळ होती. ट्रम्प आले आणि त्यांनी इराण, रशिया, उत्तर कोरिया यांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी इस्रायल आणि यूएई यांच्यात अब्राहम अ‍ॅकॉर्ड करून दिला. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांना एकत्र बसवले. ट्रम्प परत आले तर ते शरणार्थींना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

भारतात बांगलादेशी शरणार्थींबद्दल चर्चा होते तशी अमेरिकेतही शरणार्थींबद्दल आहे. इमिग्रंट्सबाबत ट्रम्प यांच्या नीतिमुळे अमेरिकेत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यांची भिंत बनवण्याची योजना यशस्वी झाली. त्यामुळे ट्रम्प परत आले तर ते इमिग्रंट्सच्या बाबतीत कठोर पावले उचलू शकतात.

शिक्षणाच्या बाबतीत प्रोजेक्ट २०२५ मध्ये ट्रम्प खुले शिक्षण देणाऱ्या विभागाला बंद करणार आहेत. त्यांच्या मते, खुले शिक्षण अमेरिकन समाजाला बिघडवत आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण विभाग बंद केला जाईल. यामुळे तालिबानी शासनासारखे वातावरण तयार होईल अशी भीती त्यांचे विरोधक व्यक्त करत आहेत.

ट्रम्पना डिक्टेटर म्हणून दाखवले जात आहे आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला जात आहे. बायडन आणि कमला हॅरिस हे मुद्दे उचलून लोकांना ट्रम्पविरोधात तयार करत आहेत.

ट्रम्प यांनी मात्र प्रोजेक्ट २०२५ ची माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्ट केले की, मी या गोष्टीबद्दल अनभिज्ञ आहे.

आगामी काळात अमेरिकन निवडणुकांमध्ये बरेच काही पाहायला मिळेल. भारतातील निवडणुकांमध्येही हुकूमशाहीचे मुद्दे पुढे येतील. अमेरिकन निवडणुकांतून काय शिकता येते आणि त्याचा भारतावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अमेरिकेत हुकूमशाही येणार? अमेरिकेत हुकूमशाही येणार? Reviewed by ANN news network on ७/२१/२०२४ १०:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".