पुणे : पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बंडूतात्या गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने १६ जुलै रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आपल्या कारने कोंबडी वाहतूक करणार्या एका टेम्पोला धडक दिली. या अपघातात तो स्वतः आणि टेम्पोचे ड्रायव्हर, क्लिनर जखमी झाले आहेत. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१६ जुलै रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास सौरभ आपली हॅरीयर कार क्रमांक MH 12 TH 0505 घेऊन मांजरी - मुंढवा रस्त्यावरून आपल्या मुंढवा येथील घरी निघाला होता. केशवनगर झेड कॉर्नर येथे त्याच्या कारने समोरून येणार्या कोंबडी वाहतूक करणार्या टेम्पोला समोसासमोर जोरदार धडक दिली. त्यानंतर तो घटनास्थळी न थांबता निघून गेला. तो गाडी चुकीच्या दिशेने आणि बेदरकारपणे चालवत होता असे समजते.
दरम्यान त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तो जखमी झाला असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले नाही. तो दारू पिऊन गाडी चालवत होता का याचा तपास करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: