भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'क्षण पावसाचे ' हा सांगीतिक कार्यक्रम शनीवार,२० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.पावसावर आधारीत गाणी,आठवणी आणि गप्पा सादर केल्या जाणार आहेत.'गोल्डन मेमरीज'प्रस्तुत या कार्यक्रमाची निर्मिती,संकल्पना आणि सादरीकरण चैत्राली अभ्यंकर यांचे आहे.संहिता लेखन अक्षय वाटवे यांचे असून ते वाचन करणार आहेत.मीनल पोंक्षे (गायन),तुषार दीक्षित(की बोर्ड),राजेंद्र हसबनीस (तबला),संजय खाडे(ऑकटोपॅड),धनश्री पोतदार(नृत्य) हे साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.रसिकांना तो विनामूल्य खुला आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१९ वा कार्यक्रम आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
७/१८/२०२४ १२:५६:०० PM
 
        Rating: 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: