महाड : पुणे ग्रामीण पोलिसांनी महाड येथे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकरने स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तसेच, तिने पुणे पोलिसांशी हुज्जत घातली होती. या घटनेनंतर मनोरमा खेडकरचा तपास सुरू होता.
पोलिसांनी तिच्या शोधासाठी तीन पथके स्थापन केली होती. मनोरमा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर पोलिसांनी तपास केला होता, परंतु तेव्हा ती आढळली नव्हती. घराच्या गेटवर कुलूप लावलेले होते आणि फोन देखील बंद होता. अखेर, महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेली मनोरमा खेडकर पोलिसांच्या हाती लागली.
महाडमधील हॉटेलमध्ये छापा टाकून तिला अटक करण्यात आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोरमा खेडकरच्या अटकेनंतर तिच्या तपासासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: