पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देणारे वायसीएमचे डॉक्टर अडकणार?; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश


पुणे: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्याबाबत नवा वाद समोर आला आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले होते. या प्रमाणपत्रावरून खेडकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे, मात्र या प्रमाणपत्राच्या वैधतेवर संशय उपस्थित झाला आहे.

या प्रकरणाच्या चौकशीत खेडकर यांना २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग आणि २०२० मध्ये मनोविकाराचे प्रमाणपत्र मिळाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये एकत्रित प्रमाणपत्र दिले गेले. याच वेळी वायसीएम रुग्णालयातून २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले असल्याचे उघड झाले आहे, ज्यामध्ये त्यांना डाव्या गुडघ्याला सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने याप्रकरणी वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अपंगत्वाचे प्रमाणपत्र देताना नियमांचे पालन झाले आहे का? याची तपासणी केली जाणार आहे. तसेच, खेडकर यांना प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर आणि इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले की, प्रमाणपत्र दिल्यानंतर अस्थिरोग व फिजोथेरपी विभागाच्या तपासणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. प्रमाणपत्र सात टक्के अपंगत्वाचे दिले गेले असून, केंद्र शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या प्रकरणात बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे कोणतेही रॅकेट असल्यास ते उघडकीस आणले जाणार आहे. चौकशीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देणारे वायसीएमचे डॉक्टर अडकणार?; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र देणारे वायसीएमचे डॉक्टर अडकणार?; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश Reviewed by ANN news network on ७/२४/२०२४ ०१:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".