पुणे : युवक क्रांती दल , भारत जोडो अभियान,संविधान प्रचारक लोकचळवळ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने गुरुवार,दि.१८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कॉन्फरन्स हॉल,एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह,पुणे येथे संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गामध्ये 'पंतप्रधान पदाचे महत्व आणि अधिकार ' या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत.
'हा अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे', असे आवाहन युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे यांनी केले आहे.हा अकरावा संविधान अभ्यास वर्ग आहे.
पुणे येथे १८ जुलै रोजी 'संविधान अभ्यास वर्ग'
Reviewed by ANN news network
on
७/१५/२०२४ ०३:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: