सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्याखाली बुडून एकाचा मृत्यू, मृत जळगाव येथील युवक..

दिलीप शिंदे 

सोयगाव : सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी अकरा वाजता उघडकीस आली आहे रविवारी सायंकाळी सदर अविवाहित तरुणाचा धबधब्यात पाय घसरला व तो कुंडात पडल्याची घटना घडली होती त्यानंतर १७ तासांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह धारेश्वर धबधब्याच्या कुंडाच्या कपारीत आढळून आला आहे 

गौरव किसन नेरकर( वय २०) रा खंडेराव नगर जळगाव असे मृत अविवाहित तरुणाचे नाव आहे जळगाव शहरातील  गौरव सह १६ जणांचा एक समूह रविवारी सायंकाळी सहा वाजता सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्याजवळ मुक्कामासाठी आले होते  रात्रभर मुक्काम करून पहाटे सकाळीच दर्शन घेवून सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास होणार होता दरम्यान  त्यातील एक अविवाहित तरुण हात पाय धुण्यासाठी  जातो असे सांगून रविवारी सायंकाळी सहा वाजता धबधब्याजवळ भ्रमंती करत असताना त्याचा अचानक तोल जाऊन पाय घसरला व तो धबधब्यात जाऊन पडला एक तास होऊनही तो परतला नसल्याने त्याचे मित्रांनी त्याचा शोध घेतला परंतु तो आढळला नाही त्यामुळे त्यांनी रात्री आठ वाजता बनोटी पोलीस दुरक्षेत्र गाठून गौरव हरविल्याची तक्रार दिली. त्यावरून सोयगाव पोलिसांनी संशयावरून गौरवाचा धबधब्यात शोध  सुरू केला रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी ग्रामस्थ व पोलीस पाटील सुनील जाधव यांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबविली. रात्री एक नंतर मोहिम थांबवून पुन्हा सोमवारी सकाळी सात वाजता सोयगावचे उपनिरीक्षक रजाक शेख, विकास दुबिले,संदीप सुसर,सतीश बर्डे,राजू बर्डे,यांनी पट्टीचे पोहणारे रामदास जाधव,यांच्या मदतीने, पोलीस पाटील सुनिल जाधव, श्रींरग जंजाळ, बंडू पाटील, सोन्या गवळी आदींनी मोहीम हाती घेतली अखेर सकाळी अकरा वाजता रामदास जाधव यांना धबधब्याच्या खोल कपारीत मृत गौरव नेरकरचा मृतदेह आढळून आला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ कादरी सपुरा यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.




धारेश्वर धबधब्यात दर वर्षी तीन ते चार जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू होतो तालुका प्रशासनाने अद्यापही या धोकादायक पर्यटन स्थळावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाही या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणे गरजेचे आहे असे स्थानिकांचे मत आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल उपनिरीक्षक रज्जक शेख विकास दुबिले संदीप सुसर राजू बर्डे आदी पुढील तपास करत आहेत.

सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्याखाली बुडून एकाचा मृत्यू, मृत जळगाव येथील युवक..  सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्याखाली बुडून एकाचा मृत्यू, मृत जळगाव येथील युवक.. Reviewed by ANN news network on ७/२३/२०२४ ०९:४५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".