इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि ललित कला केंद्र तर्फे आयोजन
पुणे : इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) पुणे उपक्षेत्रीय कार्यालय आणि ललित कला केंद्र (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. माधुरी मजुमदार यांचे कुचिपुडी नृत्य आणि डॉ.धनंजय दैठणकर यांचे संतूर वादन यांचा समावेश असलेली सांस्कृतिक संध्या आयोजित केली आहे. ही सांस्कृतिक संध्या दि.२६ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता संत नामदेव सभागृह(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) येथे होणार आहे.ही सांस्कृतिक संध्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या 'होरायझन' या मालिकेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे.इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स,पुणे उपक्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्री.राज कुमार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२२/२०२४ ०५:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: