नवी दिल्ली: आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, ज्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प मांडतील. हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलेच बजेट आहे. निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता या अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतील.
या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, युवक, महिला, आणि नोकरदार वर्गाचे लक्ष लागले आहे, आणि त्यांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाली असून तो लवकरच सादर केला जाईल. अर्थसंकल्प तयार होण्यासाठी अनेक प्रक्रियांमधून जावे लागते, ज्यासाठी मोठा कालावधी लागतो. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या तयारीच्या वेळी निर्मला सीतारमण यांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा केली होती.
अर्थसंकल्प तयार करण्यातील प्रमुख अधिकारी:
अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथ यांची भूमिका या अर्थसंकल्पाच्या तयारीत महत्त्वाची आहे. सोमनाथ हे अर्थ मंत्रालयात काम करण्याआधी पीएमओमध्ये अतिरिक्त सचिव होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात.
1994 बॅचचे आयएएस अधिकारी श्रीवास्तव हे पीएमओमध्ये अर्थविषयक अधिकारी आहेत आणि ते अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे काम पाहतात. हरि रंजन राव आणि श्रीवास्तव हे दोघेही या अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमचा भाग आहेत. राव हे औद्योगिक विभागाचे काम पाहतात आणि त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सचिव म्हणूनही काम केले आहे.
पी.के. मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली सरकारचे महत्वाचे काम चालते. 1993 बॅचचे आयएएस अधिकारी या अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमचा भाग आहेत आणि त्यांनी गृह मंत्रालयातही काम केले आहे.
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीममध्ये महसूल सचिव संजय मल्होत्रा, आर्थिक संबंध विभागाचे सचिव अजय सेठ, तुहीन कांता पांडे, आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी, मुख्य आर्थिक सल्लागार वी. अनंथा नागेश्वरन, आणि पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव अतीश चंद्रा यांचाही समावेश आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२४ १०:४४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: