पुणे : मल्लिकार्जुन मंदार कार्लेकरला कथक नृत्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी)ची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
मल्लिकार्जुन गेली आठ वर्षे गुरू सौ.आस्था कार्लेकर यांच्याकडे कथक नृत्याचे धडे घेत आहे. त्याने श्रीकालहस्ती(आंध्र प्रदेश), पारनेर, इंदौर , हैदराबाद, पुणे आदि ठिकाणी आयोजित केलेल्या विविध महोत्सवात नृत्य सादर केले आहे.
तमिळ संगम, पुणे या संस्थेतर्फे आयोजित एकल कथक नृत्य स्पर्धेत त्याने 'ब्रिलियंट कथक डान्सर' पुरस्कार मिळवला आहे. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे आयोजित कथक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
तो न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल(शनिवार पेठ,पुणे) मध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे.
मल्लिकार्जुन कार्लेकरला कथक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
Reviewed by ANN news network
on
७/१८/२०२४ १२:५९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: