विठ्ठल ममताबादे
उरण  :  महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त) या संघटनेची कार्यकारणीची सर्वसाधारण सभा दिनांक ११ जून २०२४ रोजी मुंबई येथे पार पडली. या बैठकीत सुरेश पोसतांडेल यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. 
उपाध्यक्षपदी गिरीश डुबेवार , सरचिटणीस पदी अनिल पवार ,कोषाध्यक्ष  लालू सोनकांबळे ,कार्यकारी अध्यक्ष  रामेश्वर वाघमारे,प्रमुख मार्गदर्शक व कोर कमिटी सदस्य  दीपक रोडे , विश्वनाथ घुगे, धर्मा खिल्लारे ,संघटक विजय भोंडवे व इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कासारे, उरण शाखाध्यक्ष संतोष तेलंगे, शहर सरचिटणीस विजय पवार, शाखा उपाध्यक्ष हर्षद कांबळे, कोषाध्यक्ष संजय पवार, खजिनदार महेश जाधव आदी उरण नगर परिषदेच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरेश पोसतांडेल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कामगारनेता सुरेश पोसतांडेल यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
६/११/२०२४ ०८:५२:०० PM
 
        Rating: 
      
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
६/११/२०२४ ०८:५२:०० PM
 
        Rating: 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: