निंबायती येथील रिक्षाचालकाचा मुलगा अग्निवीरमध्ये भरती

 


गावकऱ्यांनी गावातून वाजगाजत  काढली मिरवणूक....

सोयगाव  : तालुक्यातील निंबायती येथील युवक रुपेश परशराम जाधव हा अग्निवीर मध्ये भरती झाल्याने गावातील तरुण व नागरिकांनी आनंद व्यक्त करीत गावी आलेल्या रुपेश जाधवची ढोलताशांच्या गजरात गावातून वाजतगाजत मिरवणूक काढीत आनंदोत्सव साजरा केला.दरम्यान निंबायती गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच सुनीता राजू पाटील यांनी अग्निविर रुपेश जाधवचे औक्षण केले.समाजसेवक राजू पाटील यांनी पुष्पगुच्छ देत रुपेश चे गावात स्वागत केले.



            
याबाबत सविस्तर माहिती अशी,  तालुक्यातील निंबायती येथील रहिवासीअसलेले परशराम जाधव हे अपे रिक्षा चालवतात तर पत्नी मोलमजुरी करून आपल्या कटुंबाचा उदरनिर्वाह करतात.परशराम यांचा मुलगा रुपेश हा वेळ मिळेल त्यावेळेस मजुरी करून शिक्षण घेत होता.देशसेवेची जिद्द उराशी बाळगून रुपेश अभ्यास करीत होता.अग्निवीरची भरती सुरू झाली असता रूपेश जाधव ने फॉर्म भरला व संपूर्ण प्रक्रिया पार करीत रुपेश जाधव याची निवड झाली. दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी आर्टलरी ट्रेंनिग सेंटर, नाशिक येथे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. 


४ जून रोजी कसम परेड करून निंबायती या गावी परतला.गावात प्रवेश करताच गावातील मारोती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गावातील देश सेवेसाठी पहिलाच अग्निवीर असल्याने गावकऱ्यांनी मंदिरापासून त्याची ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली. यावेळी निंबायती गावातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला व रुपेश यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.गावकऱ्यांनी मुलाचे केलेले स्वागत पाहून परशराम जाधव यांना अश्रू अनावर झाले होते.
निंबायती येथील रिक्षाचालकाचा मुलगा अग्निवीरमध्ये भरती निंबायती येथील रिक्षाचालकाचा मुलगा अग्निवीरमध्ये भरती Reviewed by ANN news network on ६/११/२०२४ ०८:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".