मुख्याध्यापिकेने घेतली ४५ हजार रुपये लाच; पोलिसांनी पकडले 'रंगेहाथ'

 

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेला ४५ हजार रुपये लाच घेताना अ‍ॅन्टीकरप्शनच्या पथकाने १२ जून रोजी रंगेहाथ पकडले. यामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ माजली आहे.

संगीता नंदलाल पवार, वय ५३ वर्षे असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्या सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, वार्ड नंबर १, श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून या प्रकरणी अ‍ॅन्टीकरप्शनकडे तक्रार करणार्‍या व्यक्तीची पत्नी त्या शाळेत सन २००३ पासून उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिच्या वरिष्ठ वेतनश्रेणीच्या फरकाची रक्कम १ लाख ६२ हजार ३६७ रुपये अदा केली जाणार आहे. या फरकाच्या रकमेचे बिल मंजूर करून देण्यासाठी संगीता पवार यांनी तक्रारदाराच्या पत्नीकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. 

तडजोडीअंती ४५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. अ‍ॅन्टीकरप्शनच्या पथकाने १२ जून रोजी सापळा लावून संगीता पवार यांना शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था श्रीरामपूर संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृह, श्रीरामपूर येथे ४५ हजार रुपयांची लाच घेताना 'रंगेहाथ; पकडले. 

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये  ६१९/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुख्याध्यापिकेने घेतली ४५ हजार रुपये लाच; पोलिसांनी पकडले 'रंगेहाथ' मुख्याध्यापिकेने घेतली ४५ हजार रुपये लाच; पोलिसांनी पकडले 'रंगेहाथ' Reviewed by ANN news network on ६/१४/२०२४ ०४:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".