पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेता विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला.
यावेळी नाना काटे, संतोष कोकणे, विनोद नढे, शिरीष साठे, शाम जगताप, तानाजी जवळकर, बापू कातळे, सागर कोकणे, चंद्रकांत तापकीर, उमेश काटे, सचिन काळे, प्रशांत सपकाळ, अजय कदम,विकी साठे, आकाश साठे, निखिल घाडगे, प्रशांत देवकाते आदी उपस्थित होते.
गेली २० वर्षे सुनेत्रा पवार या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काटेवाडी निर्मलग्राम करण्यापासून त्यांनी कार्यास सुरवात केली. एनव्हायर्नमेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, वृक्षारोपण, कर्करोग जागृती, त्यांच्या ओढा खोलीकरण या उपक्रमामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरामुळे अनेकांना दृष्टी मिळाली. त्यांच्या याच काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाने राज्यसभा खासदारपदी संधी दिली. यापुढे पक्षाच्या संघटनेत त्यांच्या कार्याचा उपयोग होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: