इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये ६ नव्या रायडर्ससह १४ तरुणांचा समावेश, चॅम्पियनशीपमध्ये दाखवणार कौशल्य
चेन्नई : होंडा रेसिंग इंडियाने आज येत्या वीकेंडला मद्रास इंटरनॅशल सर्किट, चेन्नई येथे होणार असलेल्या २०२४ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी तरुण रायडर्स टीमची घोषणा केली आहे.
२०२४ सीझनचा इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप भारतातील तरुण रेसिंग गुणवत्तेच्या विकासासाठी दर्जेदार प्लॅटफॉर्म देत आहे. या पाच फेऱ्यांच्या सीझनमध्ये १४ गुणवत्तापूर्ण, तरुण रायडर्सनी मोटोथ्री रेस मशिन - NSF250R वर स्वार होत प्रतिष्ठित होंडा टीमचे प्रतिनिधीत्व करतील.
यावर्षी होंडा रेसिंग इंडियाने रेसिंग चॅम्पियन्सची पुढची पिढी घडवण्याची बांधिलकी जपत सहा नवे रायडर्स ट्रॅकवर आणले. होंडा टॅलेंट हंटमधून निवडण्यात आलेल्या या रायडर्सनी असामान्य कामगिरी, चिकाटी आणि मोटरसायकल रेसिंगच्या स्पर्धात्मक विश्वात टिकून राहाण्याची क्षमता दाखवली.
इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप हा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप्ससाठी रायडर्सच्या नव्या पिढीचा विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म आहे. ही प्रसिद्ध मोटरसायकल रेसिंग स्पर्धा गुणवत्तापूर्ण रायडर्सना प्रकासझोतात आणि होंडाच्या उद्योन्मुख रायडर्सची गुणवत्ता दाखवून देईल. या तरुण रायडर्सना आता चेन्नईतील राष्ट्रीय रेसिंग सर्किटवर लक्षणीय कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे.
इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी रायडर्सची श्रेणी
२०२४ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R मध्ये १४ तरुण आणि गुणवत्तापूर्ण रायडर्स होंडाच्या प्रतिष्ठित मोटोथ्री मशिनवर स्वार होतील. त्यामध्ये श्याम सुंदर (२० वर्ष) आणि चेन्नईचे रक्षित एस. दवे (१५ वर्ष), बेंगळुरूचे एएस जेम्स (२२ वर्ष), मल्लपुरमचे मोहसिन पी. (२२ वर्ष), बेंगळुरूचे प्रकाश कामत (२० वर्ष), कोल्हापूरचे सिद्धेश सावंत (२२ वर्ष), हैद्राबादचे बिदानी राजेंद्र (१९ वर्ष) आणि मुंबईचे राहीश खत्री (१६ वर्ष) यांचा समावेश आहे.
सहा नवे रायडर्स यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यात बेंगळुरूचे सॅवियन साबू (१६ वर्ष), टेन्नईचे रक्षित दवे (१६ वर्ष), जगथिश्री कुमारेसन (१९ वर्ष), तिरवनंतपुरमचे अरन सोनी फर्नांडिस (१५ वर्ष), त्रिचीचे स्टीव वॉ सुगी (१९ वर्ष) आणि हैद्राबादचे विग्नेश पोथु (१७ वर्ष) यांचा समावेश आहे.
इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप
इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R रेसिंग विश्वात उंचावर जाऊ इच्छिणाऱ्या तरुण रायडर्ससाठी पहिली पायरी मानला जातो. चॅम्पियनशीपमध्ये होंडा NSF250R मोटरसायकल्सचा समावेश करण्यात आला असून त्या मोटोथ्री रेसिंगसाठी खास तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म मिळणे शक्य होईल. हलक्या वजनाची चासिस, दमदार इंजिन आणि एयरोडायनॅमिक बॉडीवर्क यांसह NSF250R ट्रॅकवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करते. गुणवत्तापूर्ण रायडर्सना ओळखून त्यांचा विकास करणे व त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे या चॅम्पियनशीपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. काळजीपूर्वक आखलेला मार्ग उपलब्ध करून इदेमित्सु होंडा इंडियन टॅलेंट कप NSF250R भारतीय रायडर्सना व्यावसायिक मोटरसायकल रेसिंगच्या विश्वात उंचावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.
२०२४ सीझनमध्ये पाच फेऱ्यांचा समावेश असून त्याची सुरुवात मद्रास इंटरनॅशनल सर्किट (चेन्नई) येथे १४-१६ जून २०२४ दरम्यान होणार आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या व पाचव्या फेरीतील रेसेस याच ठिकाणी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चेन्नईत होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: