पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरात एका कापड कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला आज ३ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागून तो पूर्णपणे भस्मसात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील विजयनगर येथील एका कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. जखमींची माहिती मिळू शकली नाही. आगीचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सभोवतालच्या आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बाहेरून गोदाम भासणार्या या कारखान्यात कपडे आणि पेपर प्लेट्स तयार केल्या जात होत्या अशी माहिती मिळत आहे.तसे असेल तर हे गोदाम नसून कारखाना होता ही बाब स्पष्ट होत आहे. दाट लोकवस्तीच्या भागात कारखान्यांना परवानगी दिली जात नाही असे असताना हा कारखाना कसा काय सुरू होता? महापालिका आणि पोलीस प्रशासन यांचे याकडे लक्ष कसे गेले नाही? असे प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: