विठ्ठल ममताबादे
उरण : दिवंगत कामगारनेता शाम पदाजी म्हात्रे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.
९ जून २०२४ रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवास्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु . श्रुती म्हात्रे यांनी हा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
पुण्यतिथी निमित्त सकाळी आगरी शिक्षण संस्था शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कामगार नेत्या कु. श्रुती म्हात्रे यांच्या हस्ते स्व. शाम म्हात्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यावेळी मुख्याध्यापक पंकज भगत तसेच शिक्षक उपस्थित होते.त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी अभिवादनाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावत म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या निमित्त सामाजिक बांधिलकीतून श्रुती म्हात्रे दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात. ह्या वर्षी त्यांनी स्वामी समर्थ फाउंडेशन या संस्थेला रोख निधी स्वरूपात भेट दिली .त्यानंतर संध्याकाळी गणेश मंदीर तसेच व्यावसायिक विक्रेता संघ येथिल व्यापारीवर्गाने देखील अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.संध्याकाळी गणेश मंदिरात श्रुती म्हात्रे ह्यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली .
या निमित्त विविध पक्षातील नेतेमंडळी , कार्यकर्ते, कोकण श्रमिक संघातील सर्व कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार हे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले होते.
कामगारनेता शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांचे अभिवादन
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२४ ०८:३८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२४ ०८:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: