राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल सुरक्षा बल -पुणे यांच्या वतीने "मानव तस्करी विरोधी जनजागृती" या विषयावर परिसंवाद
पुणे : राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल सुरक्षा बल-पुणे यांच्या वतीने “मानव तस्करीविरोधी जागरूकता” या विषयावर दिनांक 10.6.2024 रोजी भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग-पुणे येथे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे, IFS सदस्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव सुश्री मीनाक्षी नेगी, मुख्य सुरक्षा आयुक्त सह महासंचालक/रेल सुरक्षा बल मध्य रेल्वे श्री हेमंत कुमार, महासंचालक / उत्तर प्रदेश पोलिस सुश्री रेणुका मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
सुश्री रेणुका मिश्रा यांनी लैंगिक संवेदनशीलता, सर्वसमावेशक जागा निर्माण करणे आणि रेल्वे मधील लैंगिक विविधता समजून आणि समर्थनास प्रोत्साहन देणे, संवेदनशील संवाद आणि महिला प्रवाशांसोबत योग्य वर्तन, आदरपूर्ण परस्पर संवादांना प्रोत्साहन देणे यावर चर्चा केली. त्यांनी सहानुभूती आणि समज असण्याची गरज आणि लिंगविशिष्ट तक्रारींना हाताळण्यासाठी संवेदनशीलता आणि करुणेने प्रोटोकॉल विकसित करण्याची गरज यावर भर दिला.
एनजीओ “मनोबल” चे सल्लागार मानसशास्त्रज्ञ श्री गौरव गिल यांनी देहबोलीचे विश्लेषण आणि फसवणूक करून होणारी मानव तस्करी रोखण्याकरीता तपशीलवार चर्चा केली.
श्री उमापती सत्तारू, आयपीएस (निवृत्त), यांनी मानवी तस्करी रोखण्याच्या मुद्यांवर भर दिला. मानवी तस्करीच्या संकल्पना, परिमाणे आणि विविध प्रकार, ट्रेंड, आकडेवारी आणि हॉटस्पॉट्स यावरही त्यांनी सविस्तर चर्चा केली. मानवी तस्करीची रोखण्या साठी कायदेशीर चौकट आणि त्याकरीता संबंधितांची भूमिका यावर देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत काही आरपीएफ जवानांनी आपले अनुभव सांगितले. जनजागृती मोहीम आणि सामाजिक सहभागाची गरज या बाबींवर जोर देण्यात आला .
सेमिनारला मध्य रेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी, रेल सुरक्षा बल कर्मचारी, GRP/पुणे कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
पुणे विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त/रेल सुरक्षा बल श्रीमती प्रियंका शर्मा यांनी आभार मानले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल सुरक्षा बल -पुणे यांच्या वतीने "मानव तस्करी विरोधी जनजागृती" या विषयावर परिसंवाद
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२४ ०८:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: