१५ जून रोजी ' व्हायोलिनग्राफी ' कार्यक्रम

 


भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम 

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत  ' व्हायोलिन ग्राफी ' या   कार्यक्रमाचे आयोजन रविवार,दि. १५ जून २०२४ रोजी   करण्यात आले आहे. 'निनाद निकेतन म्युझिक अकॅडमी' प्रस्तुत या कार्यक्रमात  गीत,संगीताचा  सुरेल आविष्कार सादर करण्यात येणार  आहे. निर्मिती,संगीत संयोजन अंजली सिंगडे-राव यांचे आहेओमकार पाटणकर(कीबोर्ड ), विलास क्षीरसागर,नितीन कुलकर्णी (तबला ), अभय इंगळे(रिदम ),प्रसाद साहोत्रे(गिटार) हे साथसंगत करणार असून आर जे तेजू,प्रफुल्ल कुलकर्णी हे  या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.इशिता वैद्य नृत्य सादर करणार आहेत.

हा कार्यक्रम रविवार, दि. १५  जून २०२४ रोजी सायंकाळी   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे  ही माहिती दिली.जागतिक व्हायोलिन दिनानिमित्त दोन दिवस आधी हा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. 
१५ जून रोजी ' व्हायोलिनग्राफी ' कार्यक्रम १५ जून  रोजी ' व्हायोलिनग्राफी ' कार्यक्रम Reviewed by ANN news network on ६/११/२०२४ ०१:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".