पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या वासुली गावच्या तलाठ्याला २० हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शनच्या पथकाने १० जून रोजी वासुलीतील तलाठी कार्यालयात 'रंगेहाथ' पकडले.
सतीश संपतराव पवार असे या तलाठ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अॅन्टीकरप्शनकडे एका २९ वर्षांच्या तरुणाने तक्रार दिली होती.
वडिलोपार्जित जमिनीच्या ऑनलाईन सातबारा वर आपले नाव दिसत नसल्याने या तरुणाने तलाठी सतीश पवार याची भेट घेतली. त्यावेळी त्याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. अॅन्टीकरप्शनच्या पथकाने १७ मे रोजी पडताळणी केली असता आरोपीने पंचांसमक्ष २० हजार रुपयांची मागणी केली. अॅन्टीकरप्शनच्या पथकाने १० जून रोजी सापळा लावला. आणि. तलाठी कार्यालयात हा वासुलीचा तलाठी लाचेची वसुली करताना अलगद अॅन्टीकरप्शनच्या पथकाच्या हाती लागला.
या प्रकरणी महाळुंगे पोलीसठाण्यात ३७०/२०२४ क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: