मध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पुणे विभागाची केली पाहणी

 



पुणे : मध्य रेल्वेचे  महाव्यवस्थापक  श्री राम करण यादव यांनी  २२ जून रोजी पुणे विभागातील लोणावळा-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची पाहणी केली.  याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

 महाव्यवस्थापकांनी  तपासणी कोचच्या विंडो द्वारे लोणावळा-पुणे डाऊन आणि अप मार्गावरील रेल्वे मार्ग, विद्युत ओव्हरहेड उपकरणे (OHE), पुलांची स्थिती,  सिग्नल यंत्रणा यासह सर्व तांत्रिक बाबींचे निरीक्षण केले.

 पुण्यात त्यांनी घोरपडी येथील डिझेल लोको शेडची पाहणी केली आणि  या वेळी 647 kWp (533 kWAC) क्षमतेच्या सोलर पॉवर पॅनलचे उद्घाटन केले.   डिझेल लोको शेडच्या छतावर एकूण 1188 (प्रत्येकी 545 WP) सौर पॅनेल 6500 चौरस मीटर परिसरात बसवण्यात आले आहेत.  या पॅनल्सद्वारे वर्षाला अंदाजे 9.44 लाख kWh वीज तयार केली जाईल आणि डिझेल लोको शेडचा वार्षिक वीज वापर 9.46 लाख kwh आहे, परिणामी 52 लाख रुपयांच्या वीज बिलाची बचत होईल.

कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 18122 टन प्रतिवर्ष कमी होण्यास मदत होईल.  हा सोलर ऊर्जा प्लांट  पर्यावरणपूरक आणि 39805  वृक्षारोपण करण्यासमान आहे.

श्री यादव यांनी पुणे रनिंग रूमचीही पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.  रनिंग रूमचा योगा हॉल, मेडिटेशन रूम, आरोग्यदायी व स्वच्छ भोजन कक्ष व स्वयंपाकघर, महिला लोको पायलट करीता स्वतंत्र सुविधा आदींची त्यांनी कसून पाहणी केली. 

 लोको ऑपरेशन शाखेने सातत्याने सुधारणा कार्य, उत्तम व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण विचार याद्वारे  लोको पायलट टीमला प्रदान केलेल्या सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

महाव्यवस्थापकांनी  सर्व अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षेकडे व प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या.

 विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे,अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह आणि सर्व शाखाधिकारी यावेळी उपस्थित होते.   

मध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पुणे विभागाची केली पाहणी मध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पुणे विभागाची केली पाहणी Reviewed by ANN news network on ६/२३/२०२४ ०१:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".