पुणे : पुण्यातील नर्हे येथे एका इस्टेट एजंटने ८ जून रोजी स्वतःवर पिस्तुलातून गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.
मयूर सुनील नरे वय ३१ राहणार जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे असे मृताचे नाव आहे.त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात काही आर्थिक देवाणघेवाणीविषयी माहिती आहे.
नर्हे सर्व्हीसरोड लगत असलेल्या एका सोसायटीत मयूर नरे यांचे कार्यालय आहे. ते काव्या ग्रूप या व्यावसायिक नावाखाली बांधकामाची आणि रिअल इस्टेट खरेदी विक्रीची कामे करत असत. ८ जून रोजी रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या भावाने कार्यालयात जाऊन पाहिले असता मयूर यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले.
सिंहगडरोड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: