पिंपरी :तब्बल १२ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ८ जून रोजी सकाळी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई तानाजी सोनवणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा धन्नो सरकार उर्फ रुबाया बिलाल मासूम नूर इस्लाम शेख (वय २४), तिचा पती धन्नो अरुण सरकार (वय २६), दीर मन्नो अरुण सरकार (वय २४) आणि लाबोनी सुशील अय्यर उर्फ साथी खातून मंडल (वय २८) अशी या घुसखोरांची नावे आहेत.
या सर्वांनी १२ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केली आहे. मागील दोन वर्षांपासून ते मोशी परिसरात रहात होते. यापैकी धन्नो सरकार रस्त्याच्या बाजूस फळविक्रीचा व्यवसाय करत होता. तर त्याचा भाऊ मन्नो एका कंपनीत नोकरी करत होता. या सर्वांनी आपण भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली होती. त्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवत होते. त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: