महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन यांच्यातर्फे आयोजन
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय यांच्यातर्फे 'कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन ' विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.महात्मा गांधी यांच्या विचारांच्या साहाय्याने जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे..
दि. ७ आणि ८ जून रोजी,सकाळी साडे नऊ ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा गांधीभवन,कोथरूड येथे होणार आहे. डॉ. जॉन चेलादुराई आणि हेदर क्युमिंग (अमेरिका ) हे अभ्यासक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.कार्यशाळेसाठी ५०० रुपये शुल्क असून अधिक माहितीसाठी अन्वर राजन ९६६५८३२२२५,ऋचा देवकर ७७६९९६२७७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२४ ०५:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: