Mirchi MOM - Mom On Mic: पुण्यातल्या मॉम्सनी गाजवला मिरचीचा मंच, ऑडिशन्स आणि ग्रँड फिनालेमध्ये दाखवले त्यांचे टॅलेंट!!
पुणे : रेडिओ मिरचीच्या "Mirchi MOM - Mom On Mic," या आगळ्या वेगळ्या स्पर्धेला पुण्यालतल्या मॉम्सनी भरभरुन प्रतिसाद दिला. 'हिंजवडी ते वारजे आई बनली आरजे' असे म्हणत, या स्पर्धेद्वारे मिरचीने पुण्यातल्या मॉम्सना दिली संधी एक दिवस आरजे बनण्याची.
गृहिणी असलेल्या मॉम्स असो किंवा बँकिंग, शिक्षण, इव्हेंट मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मॉम्स, सर्वांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेऊन मिरचीच्या मंचावर त्यांचा कलाविष्कार सादर केला. ह्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यातील १६ मॉम्सची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.
अंतिम फेरी मिरचीच्या पुणे ऑफिसमध्ये प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस फेम आरोह वेलणकर यांच्या उपस्थितीत धमाकेदारपणे पार पडली.
या प्रसंगी आरोह यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले व स्पर्धेचे परीक्षणही केले.
आरोह यांच्यासोबत परीक्षक म्हणून आरजे निमी, आरजे निधी व मिरचीच्या मॉर्निंग शोचे प्रोड्युसर शुभम कुलकर्णी उपस्थित होते. या सर्वांचे मार्गदर्शन व त्यांनी स्पर्धकांचा वेळोवेळी वाढवलेला उत्साह यामुळे अंतिम फेरी उत्तमरीत्या पार पडली. या स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे -
1. *सौ. सोनाली साठे * - एका फर्मच्या CEO म्हणून कार्यरत
2. *सौ. शुभश्री काळे* - माजी प्राध्यापिका
3. *सौ. अपर्णा गुर्जर* - सॉफ्टवेअर इंजिनिअर
या सर्वांनी त्यांच्या सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली आणि अंतिम फेरीतील निर्णय त्यांच्यासाठी अवघड करून टाकला. इतके एक से एक स्पर्धक म्हणल्यावर पहिले ३ विजेते काढणे अवघड होते असे परीक्षकांचे म्हणणे होते. या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला सहभागासाठी एक प्रशस्तीपत्र देण्यात आले व मिरचीच्या स्टुडिओची खास टूअर सुद्धा देण्यात आली. यामध्ये त्यांनी स्टुडिओ तर पहिलाच पण तिथे नेमके कसे काम होते याबाबद्दलची माहिती सुद्धा मिळवली.
या दिमाखदार स्पर्धेचे सूत्रसंचालन केले आरजे आधिश यांनी. त्यांचे हसते-खेळते तरीही प्रभावी सूत्रसंचालन या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण होते यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: