पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बोर्हाडेवाडी परिसरातील गट क्रमांक २३३ व २३४ मध्ये इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत बांधण्यात आलेली अनधिकृत बांधकामे महापालिकेने २१ मे रोजी पाडली.
दोन पोकलेन आणि तीन जेसीबी यांच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत नऊ दोन मजली बांधकामे,दोन तळमजल्यापर्यतची बांधकामे, दोन जोत्यापर्यतची बांधकामे अशी एकुण १२ हजार चौरस फुटाची आर.सी.सी. बांधकामे आणि चार पत्राशेडची एकूण ६ हजार चौरस फूट अशा १८ हजार चौरस फूट अतिक्रमणे पाडण्यात आली.
यावेळी उपआयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, उप अभियंता सूर्यकांत मोहिते,कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य,किरण सगर, बीट निरीक्षक श्रीकांत फाळके त्याचप्रमाणे भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे गणेश जामदार, किरण पठारे, ३० पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २२ सुरक्षा रक्षक,अतिक्रमण आणि अग्निशामक पथकाचे जवान उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेने बोर्हाडेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडली
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२४ ०३:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: