पुणे : नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटून तीन जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे.
अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदीपात्रात ही घट्ना घडली आहे. मूरघास तयार करण्यासाठी येथील धुमाळवस्तीवर आलेले दोन तरुण नदीपात्रातील बंधार्याजवळ आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता बुडाले.गर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी या दोघांची नावे आहेत. त्यापैकी सागर जेडगुले याचा मृतदेह सापडला परंतु अर्जुन जेडगुले याचा मृतदेह न सापडल्याने एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. धुळ्याहून आलेल्या एसडीआरएफच्या पथकाने दोन बोटींच्या साह्याने शोध सुरू केला. मात्र, नदीपात्रातील पाण्याच्या भोवर्यात एक बोट उलटली आणि शोध पथकातील पाचजण आणि एक स्थानिक असे सहाजण नदीत बुडाले.
प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
सध्या अर्जुन जेडगुले आणि शोधपथकाच्या बोटीत असलेला स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख – वाकचौरे यांचा अद्याप शोध सुरू आहे.
![एसडीआरएफची बोट उलटून तीन जवानांचा मृत्यू](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQQqEv-Lcnb6Ij04rBkOm2oAj9-HrD663dEswEfsAqv3owJ_h1M2PnV_zoveOH3oOHm50Lw3PmC2yB_kNjqkyNqXOYOe0gI8KON6NmFZIeqmq6q-M7jDWCg2fmsLj4WQwVCQGSe7i4C2MTMgRcQs7vAOevV6Ij5PNRHHOpVc820tjQmIW5hkt3DxTojGc/s72-c/akole%20boat.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: