१६३ जनावरांना विषबाधा; ६ मृत!

 


जनावरांवर उपचार करताना पशुवैद्यकीय अधिकारी


१५७ जनावरांचे प्राण वाचविण्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना यश; सोयगाव तालुक्यातील घटना..


दिलीप शिंदे

सोयगाव :   गावातील जनावरें चरत असताना ज्वारीचे फुटवे (दुरी) खाल्याने सहा जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना दि. २२ बुधवारी तालुक्यातील उप्पलखेडा येथे घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर १५७ जनावरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

   याबाबत सविस्तर माहिती अशी,  सोयगाव तालुक्यातील उप्पलखेडा गावातील गवाऱ्यातील १६३ जनावरें गावाबाहेरील शेतीशिवारात सकाळी चरता चरता उप्पलखेडा शिवारातील गट क्रमांक ७८ मधील शेतात कापणी झालेल्या ज्वारीला फुटवे आलेले होते. त्यात जनावरे शिरली व  ज्वारीची फुटवे (दुरी) खाल्याने दुपारी जनावरे थरथर कापत एक एक जमिनिवरती पडू लागल्याने गुराख्याच्या लक्षात आल्याने झालेला प्रकार त्यांनी गावात सांगितल्यावर तात्काळ बनोटी, सोयगाव, सिल्लोड येथील पशुवैद्यकीय अधिकारी तसेच परिसरातील खाजगी उपचार करणारे डाॅक्टर यांच्याशी संपर्क साधताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत जनावरांवर तात्काळ उपचार करण्यास सुरुवात केली.

 विषबाधीत १६३ जनावरांपैकी सहा जनावरे दगावली तर १५७ जनावरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. वैद्यकीय अधिकारी व्ही. आर फुसे, मंगेश काळे, दानिश बुखारी, मोहन सुनसुद्रे, निलेश खोडपे, डाॅ काकडे,नितीन कुठे, डॉ नवशाद तर खाजगी डाॅकटर अतुल दाभाडे, नितीन गोराडे, शंकर परदेशी, धीरज पाटील आदींनी परिश्रम घेत १५७ जनावरे वाचविली.  

दरम्यान विषबाधेत उप्पलखेडा येथील अभयसिंग पवार यांचा एक गोरा, एक वासरु, ज्ञानेश्वर पवार यांची एक गाय, बंकट पवार यांचा एक गोरा, लखनसिंग पवार यांची एक गाय, लियाकत अली यांचा एक बैल असे एकुण सहा जनावरे यात दगावल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

१६३ जनावरांना विषबाधा; ६ मृत! १६३ जनावरांना विषबाधा; ६ मृत! Reviewed by ANN news network on ५/२३/२०२४ १२:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".