मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

 


 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहेमोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईलअसा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉएसजयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला.

उत्तर मुंबईतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आलेल्या

डॉएसजयशंकर यांनी बीकेसी येथील 'एनएसईमध्ये पत्रकारांशी संवाद साधलाप्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होतेयावेळी डॉएसजयशंकर म्हणालेमोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेतया कालावधीत पायाभूत सुविधा किती प्रमाणात वाढल्या आणि किती प्रगती झालीते मतदार अनुभवतो आहेमोफत आरोग्य उपचार घरमुद्रा कर्जआणि स्वनिधी यात मोठी वाढ होणार आहेमोदींच्या काम करण्याच्या आणि आश्वासने पूर्ण करण्याच्या हमीवर भाजपा मतदारांचे आशीर्वाद मागत आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याची बाजू मांडायचे काम कोणी केले,कोणती विचारधारा दहशतवाद्यांविरोधात लढतेययाचा मतदारांनी विचार केला पाहिजेभाजपाच्या दहशतवादविरोधी धोरणामुळेच आज दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे असे डॉएसजयशंकर म्हणाले.

भाजपा सरकारने कलम 370 हटवण्याचे काम केले.परिणामी काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेतआता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेतएक दिवस तोही भारताशी जोडला जाईलअसा विश्वास डॉएसजयशंकर यांनी व्यक्त केला.

भाजपा आणि महायुतीचे उमेदवारकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर गती देणारे निर्णय घेतले.अनेक योजनांद्वारे व्यवसायवृद्धी घडवून आणल्याकडे श्री.जयशंकर यांनी लक्ष वेधले.

            आजमितीस देशात दररोज 28 किमी लांब महामार्ग आणि 14 किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होतेदहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झालीभारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहेजनता त्याचा नक्कीच विचार करेलअसे डॉएसजयशंकर यांनी नमूद केले.

 

   चीनच्या ताब्यात भारताची भूमी हे तर नेहरूंचे पाप

 

चीनने भारताचा भूभाग बळकावला तो 1958 ते 1963 या काळातत्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी होतेमात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहेत्यांना का करत राहू द्याआम्ही राजनैतिक मार्गाने आमचे काम करत राहूअसे डॉएसजयशंकर यावेळी म्हणाले.

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर Reviewed by ANN news network on ५/१३/२०२४ ०६:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".