चालकाकडून वयोवृद्धाला धक्का, तर प्रवासी महिलेला अपमानास्पद वागणूक; सोयगाव बसस्थानकावरील प्रकार

 


पुरेशा एस टी बसगाड्या नसल्याने प्रवाशांचे हाल......


दिलीप शिंदे 

सोयगाव : . राज्य परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव आगाराची सोयगाव मार्गे जात असलेली चाळीसगाव-बुलढाणा बस ही सकाळी ०८:४५ वाजेच्या सुमारास सोयगाव बसस्थानकावर आली. बस मध्ये प्रवाशी संख्या जास्त असल्याने चालकाच्या बाजूला असलेल्या आसनावर एक महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन बसलेली होती. सदरील महिलेला चालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने बसस्थानकावर काही काळ गोंधळ उडाला होता. मुजोर चालकाने  दरवाज्याजवळ बसमध्ये जडण्यासाठी उभे असलेल्या वयोवृद्धाला बसच्या दरवाज्या लावण्यासाठी धक्का दिल्याने वयोवृद्ध खाली पडल्याची घटना दि.२२ बुधवारी सकाळी सोयगाव बसस्थानकावर घडली.चालक व वाहकाच्या मनमानी व अरेरावीच्या भाषेमुळे बस सोयगाव बसस्थानकावर अर्धा तास उभी होती.त्यामुळे बस मधील ऐंशी नव्वदच्या जवळपास प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रवाशांशी मुजोरी करणाऱ्या चालक व वाहकावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी, चाळीसगाव आगाराची एम.एच. ०६ एस. ८७२० चाळीसगाव-बुलढाणा ही बस सकाळी ०८:४५ वाजता सोयगाव बसस्थानकावर आली. बस मध्ये प्रवासी संख्या जास्त असल्याने सोयगाव येथील प्रवाशांची तारांबळ उडाली होती. शिवना येथे जाण्यासाठी एक महिला आपल्या दोघे चिमुकल्यांना घेऊन बस मधील चालकाच्या कॅबिन मध्ये असलेल्या आसनावर बसली होती. बस चा दरवाज्या लावण्यासाठी चालक बस जवळ उभा होता.वयोवृद्ध इसम दरवाज्याजवळ बस मध्ये चढण्यासाठी उभा होता.चालकांना उभ्या असलेल्या वयोवृद्धाला धक्का दिला वयोवृद्ध खाली पडला आणि चालकाने दरवाज्या लावून घेतला.सुदैवाने वयोवृद्धाला काही इजा झाली नाही. मात्र वयोवृद्ध व वाहकामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. दरम्यान चालक गाडी पुढे घेण्यासाठी बस मध्ये चढला कॅबिन मध्ये दोन चिमुकल्यांना घेऊन बसलेल्या महिलेला पाहून चालकाने अर्वाच्य भाषेत सदरील महिलेला कॅबिन मधून मागे जाण्यास सांगितले.महिलेजवळ दोन चिमुकले असल्याने व मागे गाडीत प्रवाशांची गर्दी असल्याने महिलेने मागे जाण्यास नकार दिला.चालकाने मुजोरी करीत बस बंद केली व जो पर्यंत कॅबिन मधील महिला मागे जात नाही तो पर्यंत बस जागेवरून हलणार नाही असे सांगितल्याने बसस्थानकावर एकच गोंधळ उडाला. सोयगाव वाहतूक नियंत्रण कक्षात वाहतूक नियंत्रक व चालकामध्ये चर्चा झाली.बस ला उशीर होत असल्याने प्रवासी संतापले होते.चालक त्या महिलेला कॅबिनच्या बाहेर काढण्यावर ठाम होता चालकाला स्थानिकांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र चालक नियम दाखवीत  ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. कॅबिन मध्ये चालकाच्या डाव्याबाजूला असलेले आसन हे वाहकासाठी असते. मात्र या बसचा वाहक हा दरवाज्याजवळील आसनावर बसलेला होता. कॅबिन मध्ये असलेल्या आसनावर वाहक बसला असता व वाहक ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी ती महिला आपल्या दोघे चिमुकल्यांसह बसली असती. मात्र दरवाज्या जवळील आसन वाहक सोडण्यास तयार नव्हता तर कॅबिन मधील आसनावर बसलेल्या महिलेला चिमुकल्यांसह चालकाने कॅबिन च्या बाहेर काढले. कॅबिन मधील आसन रिकामे झाले आणि तब्बल अर्धा तासानंतर सोयगाव बसस्थानकावरून बस बुलढाण्याकडे जाण्यास निघाली. दरम्यान चाळीसगाव आगाराचे प्रवाशांशी मुजोरी करणारे  चालक व वाहकावर परिवहन महामंडळाचे अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


चालकाकडून वयोवृद्धाला धक्का, तर प्रवासी महिलेला अपमानास्पद वागणूक; सोयगाव बसस्थानकावरील प्रकार चालकाकडून वयोवृद्धाला धक्का, तर प्रवासी महिलेला अपमानास्पद वागणूक; सोयगाव बसस्थानकावरील प्रकार Reviewed by ANN news network on ५/२२/२०२४ ०४:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".