मुंबईत धुळीचे प्रचंड वादळ;घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळले (VIDEO)

 

आरे आणि अंधेरी पूर्व मेट्रोस्थानकांदरम्यान मेट्रोसेवा बंद 

मुंबई : मुंबईला आज १३ मे रोजी दुपारी प्रचंड धुळीच्या वादळाने झोडपून काढले. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मोठे धुळीचे वादळ मुंबईवर घोंघावू लागले. या वादळाची तीव्रता एव्हढी होती की. घाटकोपरच्या पंतनगर भागात एक प्रचंड मोठे होर्डींग पेट्रोलपंपावर कोसळले यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य करणार्‍या यंत्रणांनी अद्यापर्यंत ७ जखमींना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते.

दादर, कुर्ला, माहीम, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर दक्षिण मुंबईतील काही भागात रिमझिम पाऊस झाला.ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगर येथेही सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस झाला.

या वादळामुळे मेट्रो आणि लोकलसेवा विस्कळित झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईने ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाचा आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवत सावधगिरीचा इशारा दिला होता.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ओव्हरहेड उपकरणाचा खांब वाकल्याने मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा प्रभावित झाल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेच्या मुख्य प्रवक्त्याने सांगितले की, मेन लाईनवरील उपनगरी सेवा बंद करण्यात आली आहे.

अवकाळी पावसाने कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा दिला असतानाच ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि अन्य काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.

याशिवाय काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

लेटेस्ट अपडेट

पेट्रोल पंपाववर होर्डींग कोसळल्याने  70 ते 80 गाड्या याखाली अडकल्या आहेत. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर,  59 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या होर्डींगखाली 100 जण अडकले होते, अद्यापही मदतकार्य सुरू आहे.

या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  

मुंबईत धुळीचे प्रचंड वादळ;घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळले (VIDEO) मुंबईत धुळीचे प्रचंड वादळ;घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर होर्डिंग कोसळले (VIDEO) Reviewed by ANN news network on ५/१३/२०२४ ०८:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".