आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

 


विठ्ठल ममताबादे

उरण :  दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या  समाजकंटकाने केली होती. सदर इसमावर उरण पोलीस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्हयाबाबत रीतसर एफ.आय. आर देखील नोंदविण्यात आले.मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे कायदेशीर कारवाई झाली नाही.  त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १३ मे २०२४ रोजी मतदानावरच जाहीर बहिष्कार घातला.याबाबत सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले होते.


जर आरोपीवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीवरही बहिष्कार घालण्यात येणार आहे, अशी माहिती आगरी कोंढरी पाडा ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील यांनी दिली. तर उपाध्यक्ष धनेश म्हात्रे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही,ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याचे सांगितले. उपस्थित महिला ग्रामस्थ पल्लवी ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे ग्रामस्थांचे १७०० मतदान आहे. आम्हाला न्याय न मिळाल्याने तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी लक्ष दिले नसल्याने आम्ही मतदान करणार नाही. हे असेच चालू राहिले तर १७०० मतदार पुढील विधानसभेच्या निवडणूकीत मतदान करणार नाहीत अशी माहिती पल्लवी ठाकूर यांनी दिली.

आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार Reviewed by ANN news network on ५/१३/२०२४ १०:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".