मुंबई : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पोलिसांना हवा असणारा मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थामधील उदयपूर येथे अटक केली आहे.
१३ मे रोजी मुंबईत झालेल्या धुळीच्या वादळात घाटकोपर, पंतनगर परिसरात पूर्व द्रुतगतीमार्गानजिक असलेल्या एका पेट्रोलपंपावर एक होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये एकंदर १७ जणांचा मृत्यू झाला होता. ७५ जण जखमी झाले होते.
या दुर्घटनेनंतर या होर्डिंगच्या अधिकृततेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.दरम्यान हे होर्डिंग उभारणार्या इगो मीडिया या कंपनीचा मालक भावेश भिंडे याचे अनेक उद्योग माध्यमांमध्ये चर्चिले जाऊ लागले होते.मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, भिंडे याच्या एजन्सीकडे होर्डिंग लावण्यासाठी बीएमसीची परवानगी नव्हती. होर्डिंगचा आकार सुमारे १ हजार ३३८ चौरस मीटर (१४ हजार ४०० चौरस फूट)आहे. जो होर्डिंगसाठी जास्तीत जास्त परवानगी असलेल्या आकारापेक्षा नऊ पट जास्त आहे.
या प्रकरणी भावेश भिंडे आणि इतरांवर पंतनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम ३०४, ३३८ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: