पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज १६ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी सोसाट्याच्या वार्यामुळे शहरातील मोशी परिसरात एक होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत ४ मोटारसायकली आणि एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.
मोशीतील जयगणेश साम्राज्य चौकात ही घट्ना घडली्. होर्डिंग रस्त्यात कोसळले नसल्याने रहदारीलाही अडचण झाली नाही.
या घटनेचे वृत्त कळताच महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या अधिकार्यांना घटनास्थळी जाऊन घटनेबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याचे समजते.
दरम्यान जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे महापालिकेने होर्डिंगचे सर्वेक्षन करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी किवळे परिसरात होप्र्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटने काही व्यक्तींना प्राण गमवावे लागले होते.
महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग्जची संख्या मोठी असून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकात सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: