निगडी येथे कारमधून २९ लाख रुपये जप्त



पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे एका मर्सिडीझ बेंझमधून स्थापित स्थिर सर्वेक्षण पथकाने २९ लाख ५० हजार रुपये १ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जप्त केले.


MH 12 UV 5005 MERCEDES BENZ GLS 400 D  या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारची तपासणी पथकाने   केली असता  २९ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा कारमध्ये आढळल्या.  ही रक्कम  दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे दिसून आले. ही रक्कम जप्त करण्यात आली. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा तयार करण्यात आला संबंधितास जप्त केलेल्या  रक्कमेची पोचपावती देण्यात आली. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उपायुक्त प्राप्तीकर QRT मावळ विभाग ३३ मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांचेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

निगडी येथे कारमधून २९ लाख रुपये जप्त  निगडी येथे कारमधून २९ लाख रुपये जप्त Reviewed by ANN news network on ५/०२/२०२४ ०४:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".