पुणे : शिवसेना पक्षाने महिलांच्या छेडछाडीसंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत पॉर्न फिल्म कलाकारांचा वापर केल्याबद्दल भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या महिला नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सुषमा अंधारे यांनी पलटवार करत म्हटले की,चित्रा वाघ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, माझे ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचे पॉर्न व्हिडीओबाबतचे ज्ञान खूप मोठे आहे किंवा त्या त्यामध्ये तज्ञ असतील. आमच्याकडे पॉर्न इंडस्ट्री नाही, चित्राबाई कदाचित पॉर्न फिल्म पाहत असतील, आधी तुमच्या पक्षाचा सल्ला घ्या. चित्रा वाघ यांच्या आरोपाला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी अपूर्ण माहिती घेऊन बोलण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
हजारो महिलांचे शोषण करणारा, घरात काम करणाऱ्या महिलांनाही न सोडणारा रेवण्णा हा फ्रान्समध्ये मौजमजा करत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का विचारत नाही. प्रज्वल रेवण्णाबाबत मोदींनी वक्तव्य का केले नाही? भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या २५०० हून अधिक व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत. तो फ्रान्समध्ये मजा करत आहे आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. थोडी तरी लाज बाळगा, पाण्यात बुडून मरा… अशा संतप्त शब्दांत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार प्रहार केला.
Reviewed by ANN news network
on
५/०२/२०२४ ०५:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: