प्राधिकरण निगडी येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा

 



पिंपरी : हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा समजला जाणारा व्रतबंध संस्कार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरा तर्फे आज १ मे रोजी खानदेश मराठा मित्र मंडळ,प्राधिकरण येथे पार पडला.
सुरुवातीला महासंघाच्या वतीने सर्व बटूंचे औक्षण करून रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले.त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.११ वाजून २३ मि शुभमुहूर्तावर हा मुंज सोहळा पार पडला.अतिशय देखणे रुखवत या प्रसंगी मांडण्यात आले होते.


सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन मंचातर्फे श्री.संतोष गायकवाड आणि सहकारी यांनी सर्वांना मतदानाच्या दिवशी आवर्जून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले/


महासंघातर्फे वेळोवेळी ब्राह्मण आणि इतर समजासासाठी उपयुक्त असे कार्यक्रम आयोजित केले जातात.त्याच अंतर्गत या वर्षापासून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा महासंघाचा मानस आहे असे महासंघाचे अध्यक्ष श्री सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.


 या कार्यक्रमासाठी बटूंना शुभाशिर्वाद देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष श्री.शंकर जगताप,आमदार सौ.उमा खापरे,भाजप युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री अनुप मोरे, माजी नगरसेविका सौ.शैलजा मोरे,माजी नगरसेविका श्रीमती अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक श्री.सुरेश भोईर,श्री राजू गोलांडे,श्री.आर.एस.कुमार, युवा उद्योजक प्रताप बारणे, भाजप मंडल अध्यक्ष श्री.राजेंद्र बाबर,कु.तेजस्विनी कदम,श्री.सलीम शिकलगार हे मान्यवर उपस्थित होते.


श्री राजन बुडूख सराफ आणि अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या वतीने सर्व  बटूंना चांदी
चे जावे भेट म्हणून देण्यात आले.


या कार्यक्रमास ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गोविंद,कुलकर्णी,प्रदेश कार्याध्यक्ष श्री.निखिल लातूरकर,प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन,प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी,प्रदेश ब्रम्होद्योग उपाध्यक्ष श्री.राजन बुडूख,प्रदेश सचिव श्री.संजय परळीकर,पुणे शहराध्यक्ष श्री.मंदार रेडे,पुणे शहर महिला अध्यक्ष सौ.केतकी कुलकर्णी हे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच हा  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड अध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, शहर महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, सरचिटणीस श्री.आनंद देशमुख,श्री.मुकुंद कुलकर्णी,सरचिटणीस श्री.राहुल कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष श्री.अतुल इनामदार व श्री.भाऊ कुलकर्णी,श्री.प्रशांत कुलकर्णी,श्री.अभय कुलकर्णी,श्री.मकरंद कुलकर्णी,श्री.वैभव खरे,श्री.अजित देशपांडे,सौ.संध्या कुलकर्णी,सौ.वैशाली कुलकर्णी,सौ.धनश्री देशमुख,सौ.साक्षी जोशी,सौ.कविता बारसावडे,सौ.अपर्णा खरे,सौ आरती खोसे,सौ.अनिता कुलकर्णी.सौ.संगीता कुलकर्णी,सौ.संपदा गुपचूप,सौ.नेहा साठे,सौ.मधुवंती वखरे,कु.ऋजुता कुलकर्णी,कु.पूर्वा बारसावडे व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी गेली १ ते १.५ महिना अतिशय मेहनत घेवुन हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.
या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे शंकर जगताप यांनी देखील महासंघाचे कार्याची दखल घेऊन कौतुक केले.


ह्या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री अनुप मोरे आणि  महासंघाच्या हितचिंतकांनी सढळ हाताने मदत केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश बारसावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.आनंद देशमुख यांनी केले.

प्राधिकरण निगडी येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा प्राधिकरण निगडी येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा Reviewed by ANN news network on ५/०२/२०२४ ०४:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".