पुणे ः श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर ट्रस्ट आणि कलांगण अकादमी च्या वतीने ' आनंद तरंग ' या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन दि. ११मे २०२४ रोजी करण्यात आले आहे.'स्वरगंध,पुणे'प्रस्तुत या कार्यक्रमात डॉ.नीलिमा राडकर या व्हायोलिनमधून आणि माधवी करंदीकर या हार्मोनियममधून लोकप्रिय मराठी भक्तीगीते सहवादनातून सादर करतील.अभिजित जायदे,जितेंद्र पावगी(तबला),नरेंद्र काळे (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. यशश्री पुणेकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार, दि.११ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर,(नारायण पेठ) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे
११ मे रोजी 'आनंद तरंग' कार्यक्रम
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:४३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: