आश्वी ता. संगमनेर येथील कु. प्रतिक्षा भंडारी घेणार जैन भगवती दिक्षा; मोठ्या समारोहाचे आयोजन

 


 संगमनेर : आश्वी, ता. संगमनेर येथील सुशीलजी भंडारी यांची सुविद्य कन्या कु. प्रतिक्षा भंडारी ९ जून रोजी जैन भगवती दीक्षा घेणार आहे. तिने आपले इंजिनिअरींगमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर अध्यात्ममार्गाकडे वळण्याचा निर्णय घेतला.  

परमपूज्य आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य जिन शासन गौरव परमपूज्य सुनंदाजी म.सा. यांच्या प्रेरणेने ती  जैन भगवती दीक्षा घेणार आहे.  तिच्या दीक्षाविधीसाठी अर्हमविजाप्रणेता उपाध्याय प्रवर प.पू. श्री प्रवीणऋषीजी म.सा., प्रखर व्याख्याता प.पू. लोकेशऋषीजी म.सा., मधुरकंठी आतापणा साधक प.पू. श्री तीर्थेशऋषिजी म.सा., उपप्रवर्तिनी साध्वीरत्ना प.पू. श्री संन्मतिजी म.सा.,वाणीभूषण प.पू. प्रीतीसुधाजी म.सा., कैवल्यधाम प्रेरक प.पू.  श्री कैवल्यरत्नाश्रीजी म.सा., स्वाध्याय प्रेमी प.पू. श्री प्रियदर्शनाची म.सा., मधुरव्याख्याता प.पू. श्री विश्वदर्शनाची म.सा., सतत उद्यमी प.पू. श्री सुचेताजी म.सा. सेवाभावी विदुषी प.पू. कीर्तीसुधाजी म.सा. मधुर व्याख्याता प. पू. श्री सुनिता जी म.सा, मधुर व्याख्याता प.पू. श्री ज्ञानप्रभाजी म.सा विद्याबिलासी प.पू. श्री सुप्रियाजी म. सा., राजस्थान विरांगणा प.पू. श्री जयश्री जी म.सा प्रखर वक्ता प.पू. श्री सुप्रभाजी म. सा. उपप्रवर्तिनी प.पू.श्री चंदनबालाजी म. सा. प्रतिभाशाली प.पू. श्री शुभदाजी म. सा. बुलंदवाणी प.पू. श्री पद्मावती जी म.सा. अध्ययनप्रेमी प.पू. श्री सुबोधिजी म.सा., सतत उत्साही प.पू. श्री सुवीज्ञाजी मसा, स्वाध्याय प्रेमी प.पू. श्री सुजिज्ञाजी म.सा., प.पू.श्री भारवीजी म.सा .नवदीक्षिता प.पू. श्री समृद्धीची म.सा. आदी साधूसंत यावेळी उपस्थित राहून प्रतिक्षाला आणि उपस्थितांना आशीर्वादित करणार आहेत.

या दीक्षाविधीचा प्रारंभ आश्वी, ता. संगमनेर,  जिल्हा अहमदनगर  येथे बुधवार दिनांक ५ जून रोजी होणार असून शनिवार दिनांक ८/६/२०२४ रोजी केशर छाटणा, तसेच सकाळी ८:३० वाजता वरघोडा ,सायंकाळी ७:३०० वाजता भक्ती संध्या(मेहुल रूपडा, दर्शीत गादीया ), कुंकुम,  रक्षाबंधन, मेहेंदी असे विविध कार्यक्रम ४ दिवसात होणार आहेत. रविवारी दिनांक ९/६/२०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता मूळ दीक्षाविधी होणार आहे.

या दीक्षा समारोहाचे उत्कृष्ट नियोजन श्रावक संघ अध्यक्ष सुमतीलालजी गांधी, उपाध्यक्ष ईश्वरलालजी भंडारी ,सचिव प्रकाशलालजी मुथा ,खजिनदार वसंतलालजी गांधी , संतोषजी भंडारी, किशोर पटवा ,योगेश रातडीया , अभिजीत गांधी, दिलीपजी पटवा, किशोरजी पटवा, मिलींदजी बोरा, संजयजी गांधी आदि करत आहेत  तसेच गौतम गांधी, निलेश रातडीया, नितीन गांधी ,निलेश चोपडा ,अमित भंडारी ,दीपक बोरा , रोहित भंडारी ,प्रीतम गांधी, राजेन्द्र भंडारी, समीर गांधी, प्रशांत गांधी, आश्विन मुथा, किरण गांधी, पंकज नाके, मंगेश रासने, पपलेश लाहोटी, बजरंग ढगे, चांगदेव खेमनर आदी जैन युवक गेल्या २ महिन्यापासून परिश्रम घेत आहेत 

दीक्षा समारंभासाठी नवकार ग्रुप, युवक मंडळ, महिला मंडळ, बहु मंडळ ,कन्या मंडळ, आनंद पाठशाळा, बालक एवम् बालिका मंडळ ,भारतीय जैन संघटना आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे सर्व परिश्रम घेत आहेत

अशी महिती अश्वी जैन संघाचे सुमतीलाल गांधी व ईश्वर भंडारी यांनी दिली आहे

आश्वी ता. संगमनेर येथील कु. प्रतिक्षा भंडारी घेणार जैन भगवती दिक्षा; मोठ्या समारोहाचे आयोजन आश्वी ता. संगमनेर येथील कु. प्रतिक्षा भंडारी घेणार जैन भगवती दिक्षा; मोठ्या समारोहाचे आयोजन Reviewed by ANN news network on ५/२७/२०२४ ०८:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".