केअर ऑफ नेचर संस्थेने दिले नवरंग पक्ष्याला जीवदान

 


विठ्ठल ममताबादे

उरण  : 'केअर ऑफ नेचर' संस्थेचे चिंचपाडा शाखाध्यक्ष रुपेश पाटील यांना पनवेल येथील करंजाडे येथे त्यांच्या राहत्या घराजवळ 'भारतीय नवरंग' हा पक्षी अशक्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी या पक्षाला तिथून उचलून पुढील उपचारासाठी 'केअर ऑफ नेचर' संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांना ही बातमी सांगितली. 

 नवरंग हा दुर्मिळ पक्षी अशा कमकुवत अवस्थेत असल्याचे कळताच मुंबईकर यांनी त्या पक्षावर उपचार करण्यासाठी त्याला वेश्वी येथे आपल्या घरी आणून  उपचार करण्यास सुरुवात केली.

     दुर्मिळ आणि तितकाच आकर्षक असा हा 'नवरंग' पक्षी, सुश्रुषा करून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी वेश्वी येथील डोंगररानात त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

    पावसाळ्यापूर्वी अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून महाराष्ट्रभरात येत असतात. त्यातून रायगड जिल्ह्यासाठी आकर्षण ठरणाऱ्या अनेक पक्षातील प्रमुख आकर्षण ठरणारा पक्षी म्हणजे हा 'भारतीय नवरंग'. या पक्षाच्या शरीरावर असलेल्या विविध नऊ रंगामुळेच 'नवरंग' हे नाव पडलेलं आहे. याला इंग्रजीमध्ये 'इंडियन पिट्टा' म्हणतात.पक्षीप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांना या पक्षाच्या असलेल्या विलक्षण सौंदर्याची भुरळ पडलेली असते. आता रायगड जिल्ह्यात वीण करण्यासाठी आलेल्या या नवरंग पक्षाला पाहण्यासाठी पक्षप्रेमी याचा रानवाटेत शोध घेताना दिसून येत आहेत.
केअर ऑफ नेचर संस्थेने दिले नवरंग पक्ष्याला जीवदान केअर ऑफ नेचर संस्थेने दिले नवरंग पक्ष्याला जीवदान Reviewed by ANN news network on ५/२७/२०२४ ०८:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".