गौरव म्हात्रे गोल्डन अवर हिरो पुरस्काराने सन्मानित

 



विठ्ठल ममताबादे

उरण : उरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर ६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११ वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती, पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या गंभीर अपघातात तीन वर्षाच्या जखमी चिमुरडीला उरण नागाव म्हातवली येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांनी जखमी मुलीला त्वरित उपचार मिळावे,तिचे प्राण वाचावेत या दृष्टिकोनातून त्या तीन वर्षाच्या जखमी चिमुरडीला बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये भरती केले. त्वरित हॉस्पिटल मध्ये भरती केल्याने ३ वर्षाच्या गंभीर जखमी चिमुरडीवर त्वरित उपचार सुरु झाले. व तीचे प्राण वाचले. गौरव म्हात्रे यांच्या सारख्या प्रसंगावधानी, तत्पर सामाजिक कार्यकर्त्यामुळे त्यांनी दाखविलेल्या धाडसी कार्यामुळेच तीचे प्राण वाचले आहेत. गौरव म्हात्रे यांनी दाखविलेल्या या माणुसकीच्या कार्याची दखल घेत अपोलो हॉस्पिटल तर्फे वर्ल्ड इमर्जन्सी डे (जागतिक आपत्कालीन दिवस )चे औचित्य साधून वार्षिक अवॉर्ड 'गोल्डन अवर हिरो' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलचे इमर्जन्सी डिपार्टमेंट हेड डॉ. नितीन जगासिया यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.यावेळी हॉस्पिटल विविध विभागातील डॉक्टर, नर्स, अधिकारी कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.


उरण नागाव म्हातवली येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. अनेकांच्या सुखदुःखात धावून गेले आहेत.गौरव म्हात्रे यांनी सुरज तांडेल ग्रुप तर्फे अनेक सामाजिक कार्ये सुद्धा केली आहेत.गौरव म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गौरव म्हात्रे गोल्डन अवर हिरो पुरस्काराने सन्मानित गौरव म्हात्रे गोल्डन अवर हिरो पुरस्काराने सन्मानित Reviewed by ANN news network on ५/२७/२०२४ ०८:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".