दिलीप शिंदे
सोयगाव : जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ २ मे रोजी सोयगाव शहरात प्रचारसभा झाली. या सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचवीस वर्षे खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांना कधी ईद,होळी आठवली नाही यावेळेस मात्र मतदारसंघातील तांड्यावर होळीसाठी हजेरी लावली.गेल्या पंचवीस वर्षात दानवेंचा ताड्यांवरील होळीचा फोटो दाखवा पाच हजार बक्षीस मिळवा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी केले. यावेळी माजी आमदार नामदेव पवार, कम्युनिस्ट पक्षाचे तालुकाध्यक्ष राम बाहेती यांची भाषणे झाली. त्यांनी सत्ताधार्यांवर कडक टीका केली.
यावेळी बोलताना कल्याण काळे म्हणाले, पंचवीस वर्षे खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांना सोयगाव तालुक्यातील बंजारा समाज कधी आठवला नाही. लोकसभेच्या निमित्ताने मतदारांना आकर्षित करण्यासाठी का होईना ते तांड्यावर होळी खेळण्यासाठी आले.बंजारा समाजात होळीला आलेल्या पाहुण्याला धरून मारतात तुम्ही त्यांना मारले की नाही असे सभेला उपस्थित असलेल्या मतदारांना विचारले तेंव्हा मतदानतून मारणार असा आवाज मतदारांमधून घुमल्याने एकच हशा पिकला होता. डॉ.कल्याण काळे सोयगाव येथील प्रचार सभेत बोलत होते.
श्रीरामांविषयी आम्हांला ही आस्था आहे ते आमचे दैवत आहे. देवधर्म व निवडणूक हे वेगवेगळे विषय आहेत. प्रभू श्रीरामानी भाजपमध्ये प्रवेश घेतला की काय असे वाटायला लागले आहे. असेही ते म्हणाले.
आशा सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, शेतकरी, शेतमजूर, गायरान जमिनीचा प्रश्न सोडवून सर्व घटकांना महाविकास आघाडीच न्याय देऊ शकते.भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पायी यात्रा काढली हा मोठा त्याग आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांचा विकास केला जाईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिले ते जर वाचवायचे असेल तर जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांची निशाणी पंजा या निशाणीचे बटन आशीर्वाद रुपी दाबून सेवेची संधी द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
यावेळी माजी खासदार जयसिंग गायकवाड,माजी आमदार नामदेव पवार, राजेंद्र राठोड उपजिल्हाप्रमुख (उबाठा),विठ्ठल बदर, इंद्रजित साळुंखे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी, दिलीप मचे तालुकाप्रमुख (उबाठा), राजेंद्र काळे तालुकाध्यक्ष काँग्रेस, रवी काळे राष्ट्रवादी शहराध्यक्ष, रवींद्र काटोले शहरप्रमुख (उबाठा), दिनेशसिंह हजारी शहराध्यक्ष काँग्रेस,कृष्णा जुनघरे,अजित पांढरे, सुदर्शन अग्रवाल,रघुनाथ चव्हाण व महाविकास आघाडी घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक,महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवी काळे यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२४ ११:०८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: