बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होणार असून यासाठी बारामती येथील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची इतर विधानसभा मतदारसंघात नेमणूकीच्या ठिकाणी जाण्या-येण्याकरीता बारामती बसस्थानक येथून ६ मे रोजी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघात जाण्यासाठी ४ बसेसची व्यवस्था करण्यात असून त्या सकाळी ६.३० वाजता निघणार आहेत. याकरीता संपर्क अधिकारी म्हणून गणेश सोनवले ८२०८४८१३०४ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात जाण्यासाठी ५ बसेस सकाळी ६.३० वाजता निघणार असून संपर्क अधिकारी म्हणून किरण माने ९५११८८२११५ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात जाण्यासाठी ६ बसेस सकाळी ६ वाजता निघणार आहेत. याकरीता संपर्क अधिकारी म्हणून प्रवीण भगत ८६००६४२१११ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भोर विधानसभा मतदारसंघात जाण्यासाठी १० बसेस सकाळी ५ वाजता निघणार असून संपर्क अधिकारी म्हणून राजेश गायकवाड ९१४६२३५७५८ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात जाण्यासाठी ८ बसेसची सकाळी ६ वाजता निघणार असून संपर्क अधिकारी संदीप कांबळे ८६०५८५१४१४ हे असतील.
अधिक माहितीसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बारामती बसस्थानक येथे नियोजित वेळेत उपस्थित राहून नेमणुकीच्या ठिकाणी जावे, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०४/२०२४ १०:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: