पुणे : मध्यरेल्वेच्या पुणे विभागाने अलिकडच्या आठवड्यात स्थानकांवर आणि गाड्यांमधील अनधिकृत विक्री क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, सहायक सुरक्षा आयुक्त, वाणिज्यिक निरीक्षक, खानपान निरीक्षक, तिकीट विभागीय कर्मचारी, चेकिंग कर्मचारी, आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम तयार करून विशेष मोहीम राबवली आहे.
दिनांक 27 एप्रिल 2024 पासून अनधिकृत विक्रेत्यां विरुद्ध सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर इत्यादी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यां मध्येही ही मोहीम राबविण्यात आली. अनधिकृत विक्रेते शिजवलेले अन्न, अनधिकृत ब्रँडचे पॅकेज केलेले पिण्याचे पाणी, अस्वच्छ परिस्थितीत पॅक केलेले स्नॅक्स, तसेच गाडीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर आणि परिसरात चहा/कॉफीची विक्री करताना आढळले.
या मोहिमेदरम्यान एकूण 560 अनधिकृत विक्रेते पकडण्यात आले त्यापैकी 351 विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या विक्रेत्यांकडून सामूहिक दंड म्हणून रुपये 3,17,425/- वसूल करण्यात आले आणि 12 मे 2024 पर्यंत 1945 विनापरवाना पॅकेज केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
मोहिमेदरम्यान टीमने विविध कॅटरिंग स्टॉल्सची अचानक तपासणी केली ज्यामध्ये केटरिंग स्टॉलमध्ये अनेक कमतरता आढळल्या आणि सोशल मीडियाद्वारे प्राप्त झालेल्या विविध ऑनलाइन तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात आले आणि परवाना धारकांवर नोटीस/दंड आकारण्यात आला आणि केटरिंगवर शुल्क आकारण्यात आले. स्टॉल्स वरील तैनात कर्मचाऱ्यांना देखील योग्य वर्तनाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला. विनापरवाना पॅकेज्ड पिण्याचे पाणी विकणे आणि खाद्यपदार्थांवर जास्त शुल्क आकारणे यासारख्या उल्लंघन यासाठी एकूण 60,000/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
याव्यतिरिक्त या मोहिमेदरम्यान गुणवत्ता तपासणीसाठी प्लॅटफार्म वरील विविध अधिकृत स्टॉल मधून नऊ खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले. नमुन्याची तपासणी केल्यानंतर काही कमतरता आढळून आल्यास संबंधित परवाना धारकावर नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल.
या कारवाईमुळे आणि अन्नाचा दर्जा तपासल्यामुळे आता प्रवाशांना ताजे आणि उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जात आहेत. रेल्वे अधिकारी अनधिकृत विक्रेत्यांवर कडक नजर ठेवतात जे प्रवाशांना अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पॅकेज केलेले पिण्याचे पाणी विकतात, ज्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि त्यांचा प्रवास गैरसोयीचा होऊ शकतो. येत्या आठवडाभर देखील ही मोहीम सुरू राहणार आहे.
पुणे रेल्वे विभाग प्रशासनातर्फे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी रेल्वेच्या स्टेशन, परिसरात असलेल्या अधिकृत स्टॉल्स किंवा विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करावेत आणि रेल्वे किंवा प्लॅटफॉर्मवर अनधिकृत विक्रेते किंवा गैरप्रकार निदर्शनास आल्यास सोशल मीडिया, रेल मदद तक्रार पुस्तिका या सारख्या कोणत्याही संपर्काच्या माध्यमातून कृपया त्वरित कळवावे.
रेल्वेच्या पुणे विभागाकडून अनधिकृत विक्रेत्यांविरूद्ध विशेष मोहीम
Reviewed by ANN news network
on
५/१३/२०२४ ०४:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: