पिंपरी चिंचवडमध्ये पाच बांगलादेशी घुसखोर पकडले!

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने २५ मे रोजी सायंकाळी शहरातील शांतीनगर, भोसरी परिसरातून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. यामुळे भोसरी परिसरात एकच खळबळ माजली असून शहरात मोठ्याप्रमाणात बांगलादेशी घुसखोरांनी शिरकाव केला असून बनावट कादगपत्रांच्या आधारे आपण भारतीय नागरिक असल्याचे ते भासवत असल्याची चर्चा नागरिकात सुरू आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग अरुण लांडे (वय-32) यांनी भोसरी पोलीसठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शमीम नुरोल राणा (वय 26 रा. जमलपूर, जि. ढाका), राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय 27 रा. लक्ष्मीपूर जि. मदारीपूर), जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय 38 रा. चर आबूपूर, जि. बोरीसाल), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा (वय 26 रा. फुलबरिया), आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय 32 रा. फुलबरिया जि. मयमेनसिंग, बांगलादेश) या घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.

त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍या अन्य काहीजणांवरही भारतीय दंडविधान कलम  420, 465, 468, 471, 34 सह परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार भोसरी शांतीनगरमध्ये असलेल्या ओम क्रिएटीव्ह टेलर या कंपनीत काही बांगलादेशी घुसखोर काम करत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.पोलिसांनी तेहे जाऊन तपासणी केली असता तेथे पाच बांगलादेशी नागरिक कोणत्याही वैध दस्तावेजाशिवाय काम करताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते भारतात घुसखोरी करून शिरल्याची कबुली त्यांनी दिली.बनावट आधारकार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्ट बनवून घेऊन त्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे त्यांनी भासवले. 

पिंपरी चिंचवडमध्ये पाच बांगलादेशी घुसखोर पकडले! पिंपरी चिंचवडमध्ये पाच बांगलादेशी घुसखोर पकडले! Reviewed by ANN news network on ५/२८/२०२४ ११:४६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".