जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुणे, महाड येथे गुन्हे दाखल; मागितली माफी

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल २९ मे रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. त्यानंतर महाड आणि पुणे येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आव्हाड यांनी एक्स या मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.

राज्यशासनाने शालेय अभ्यासक्रमात ‘अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम ।’ (अर्थ : ज्येष्ठ नागरिक, पालक आणि शिक्षक यांचा आदर आणि सेवा करणार्‍यांचे आयुष्य, यश, विद्या आणि बळ वाढते.) या अर्थाचा मनुस्मृतीतील श्लोक घेण्याचे ठरविले होते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्याला कडाडून विरोध केला. मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी ते आपल्या कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन २९ मे रोजी महाड येथे पोहोचले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेधाची भाषणे केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांसह मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी बाबासाहेबांचा फोटो असलेली पोस्टर्स जाळण्यासाठी फाडली. 

या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशलमीडियावर प्रसारित झाल्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. पुण्यात भारतीय जनतापक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष भीमराव बबन साठे यांनी  बंडगार्डन पोलीसठाण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तर जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून आव्हाड यांच्यासह २२ जणांवर भारतीय दंडविधान कलम १८८ आणि मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार महाड येथे गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान आव्हाड यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट. भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय हे राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.

या सर्व प्रकारानंतर आव्हाड यांनी एक्स वर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे. 'मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही.मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र आज मी माफी मागतोय,कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकरप्रेमी मला माफ करतील, हा विश्वास आहे.' असे त्यांनी म्हटले आहे.



जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुणे, महाड येथे गुन्हे दाखल; मागितली माफी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुणे, महाड येथे गुन्हे दाखल; मागितली माफी Reviewed by ANN news network on ५/३०/२०२४ १२:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".