मुंबई : लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून मुंबई पोलिसांनी ३ आणि ४ मे हे दोन दिवस गुन्हेगारांच्याविरोधात ऑपरेशन ऑल आऊट राबविले.
सुमारे १५ तासांच्या या मोहिमेत १७५ वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये ८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. ५३ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपींवर कारवाई करण्यात आली. अवैध शस्त्रांसंबंधी ४९ कारवाया करण्यात आल्या.२४ अवैध धंद्यांवर छापे घालण्यात आले. या मध्ये ३० जणांना अटक करण्यात आली. ५ जणांना अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी अटक करण्यात आली. तडीपार आरोपींच्या शोधार्थ ६२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या शिवाय २०६ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.त्यात २३० जन पोलिसांच्या हाती गवसले.१११ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली त्यात २२४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालवताना सापडलेल्या ७७ चालकांवर कारवाई करण्यात आली.
ही मोहीम मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरातील पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, १३ परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, संरक्षण आणि सुरक्षा, ४१ विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी पार पाडली.
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२४ ०४:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: