वातावरण तापले
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात ७ मे रोजी होत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता आज होत आहे.अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभाही होत आहेत. दोन्ही गटांचे कार्यकर्ते बारामतीत मोठ्यासंख्येने आले असून शरद पवार गटाची रॅली आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली असल्याचे वृत्त आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार बारामती नगरपरिषदेसमोर शरद पवार यांच्या गटाची रॅली आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक होणार असे दिसत असल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करीत शांतता राखण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.
बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. दोन्ही गटांचे राजकीय अस्तित्व या लढतीत पणाला लागले असल्यामुळे यश खेचून आणण्यासाठी दोन्ही गट प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२४ ०४:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: