कोल्हापूर : कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला २६ एप्रिल रोजी २५ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शन खात्याच्या कोल्हापूर कार्यालयातील अधिकार्यांनी 'रंगेहाथ' पकडले.
किर्ती धनाजी देशमुख, वय ३२ वर्षे, अन्न सुरक्षा अधिकारी ( वर्ग - २) नेमणूक अन्न व औषध प्रशासन कार्यालय, कोल्हापूर रा. विश्व रेसीडेन्सी, फ्लॅट नं. २०२, ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ रा. समर्थनगर, मोहोळ, ता.मोहोळ, जि. कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी एका व्यावसायिकाने तक्रार दिली होती. या व्यावसायिकाचे किणी, ता. हातकणंगले येथे समर्थ फूड्स नावाचे रेस्टॉरंट आहे. आरोपी किर्ती देशमुख यांनी १५ मार्च रोजी त्यांच्या रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांचे नमुने घेतले. आणि कारवाई करण्याची भीती घालून कारवाई करावयाची नसल्यास १ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ७० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. आणि, २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन येण्यास सांगितले. २५ एप्रिल रोजी त्या व्यावसायिकाने अॅन्टीकरप्शनकडे तक्रार केली.अॅन्टीकरप्शनच्या पथकाने पडताळणी करून २६ एप्रिल रोजी सापळा लावला. आणि, २५ हजार रुपयांची लाच घेताना किर्ती देशमुख यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी शाहुपुरी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अॅन्टीकरप्शन ब्युरोचे पुणे येथील अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सरदार नाळे, श्रेणी उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, कॉन्स्टेबल सुधीर पाटील, पूनम पाटील यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२४ ०५:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: